चंदिगड करे आशिकी या आपल्या आगामी सिनेमात आयुष्मान खुराना अगदी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. आयुष्मान त्याच्या रोलसाठी नेहमीच काही तरी नवीन चॅलेंज स्वीकारत असतो. असेच एक चॅलेंज याने “चंदिगड करे आशिकी’साठीही स्वीकारले होते.
या सिनेमासाठी त्याला एकदम बल्की बॉडी हवी होती. कारण या सिनेमात तो एका जिम ट्रेनरच्या रोलमध्ये दिसणार आहे. तो एक वेटलिफ्टिंग चॅम्पियन असणार आहे. स्वाभाविकच त्याची शरीरयष्टी थोडी बल्की असणार आहे.
त्यामुळे आयुष्मानने जिममध्ये बराच वेळ घाम गाळला. त्याचा परिणाम आपल्याला पडद्यावर बघायला मिळणार आहे. या सिनेमात आयुष्मानच्याबरोबर वाणी कपूरही असणार आहे. तिने
आयुष्मानची फिरकी घेतली आहे. सिनेमात बॉडी बिल्डर आयुष्मानसाठी एक न्यूड सीनदेखील असणार आहे, असे तिने त्याला उगाचच खोटे खोटे सांगितले.
सिनेमाचे डायरेक्टर अभिषेक कपूर यांनीही आयुष्मानला तसेच सांगितले होते. हा सीन कसा असेल याची पूर्वकल्पनाही त्याला देण्यात आली. त्यावर आयुष्मानने अगदी शांतपणे “करना पडेगा तो कर लुंगा’ असे उत्तर दिले होते. आपल्या रोलसाठी प्रसंगी न्यूड होण्याची त्याची तयारी होती.