Ayodhya Earthquake : अयोध्येत रविवारी पहाटे भुकंम्पाचे धक्के बसल्याने एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. लोकांना भूकंपाचे हलके धक्के जाणवले असल्याचे सांगण्यात येत आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनएससी) ने याविषयी माहिती दिली. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू अयोध्येपासून 215 किमी उत्तरेस 10 किमी खोलीवर होता. भूकंपाचा परिणाम उत्तर भारतातही दिसून आला. अयोध्येत पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा लोक दहशतीतून सावरले नव्हते.
शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या ६.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाने नेपाळमध्ये हाहाकार माजवला आहे. भूकंपामुळे मृतांची संख्या 157 वर पोहोचली आहे. एजन्सी बचाव आणि मदत कार्यात गुंतल्या आहेत. घरांच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. शनिवारपासून कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.
अफगाणिस्तानातील फैजाबादमध्ये रात्री उशिरा ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. शुक्रवारी रात्री उशिरा उत्तर प्रदेशसह देशातील अनेक भागात पृथ्वी हादरली. जीव वाचवण्यासाठी लोक घराबाहेर पडले.