मुंबई – हर हर महादेव या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर अखेर समोर आला आहे. चित्रपटाच्या टीजरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आवाज वापरण्यात आलेला असल्यामुळे या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर दमदार अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार असलयाचे स्पष्ट झाले. आता ट्रेलर आल्यानंतर अभिनेता शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झाले/
ट्रेलरमध्ये बाजीप्रभू शिवाजी महाराजांविरोधात बोलताना दिसत आहे. यामुळे चित्रपटाच्या कथेबाबतची उत्सुकता अजून वाढली आहे. शिवाय घोडखिंडीत दमदार लढाई या चित्रपटात दिसणार आहे. त्यासाठीच्या जबरदस्त ऍक्शनची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. त्यासोबतच शिवाजी..शिवाजी ही धून अक्षरशः अंगावर शहरा आणते.
शरद केळकर आणि सुबोध भावे या दोघांसोबत अमृता खानविलकर,सायली संजीव यांच्याही मुख्य भूमिका या चित्रपटात आहेत. यासोबतच ‘हर हर महादेव’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे जो एकाच वेळी हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल.