मुंबई – चित्रपट चांगले हिट झाले की अनेकदा सिने कलाकार राजकारणाच्या आखाड्यात उतरतात. अभिनेत्री किनारा अडवाणी आपल्या लुक्ससह अभिनयामुळे देखील चर्चेत असते. नुकतच अभिनेत्रीने एका मीडियाहाऊसच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी मंचावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. अशात कियाराला तू कोणाच्या पक्षात जाणार असा सवाल विचारण्यात आला.
एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमासाठी अभिनेत्री कियारा अडवाणी उपस्थित होती. यावेळी शेर शा चित्रपटातील अभिनयाबद्दल तिला पुरस्कार देखील देण्यात आला. तर ८३ या चित्रपटातील अभिनयासाठी रणवीर सिंगला पुरस्कार देण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण पार पडले. यावेळी कियाराला तू शिंदेंची पार्टी जॉईन करणार की फडणवीसांची असा राजकीय सवाल विचारण्यात आला.
राजकीय प्रश्न समोर येताच रणवीरने तिला तेथून निघण्यासाठी अनेक इशारे केले परंतु ती म्हणाली,” माफ करा,आय थिंक मी अभिनेत्री म्हणूनच खूप चांगली आहे”. यावेळी कियाराने आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वांचे मराठीतून आभार मानले. शेर शहा हा चित्रपटात हा माझ्या आवडीचा चित्रपट असलयाचे देखील यावेळी ती म्हणाली.