शिक्रापूर – शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी करोना विषाणूबाबत सजगता बाळगणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी समाजात, कुटुंबात तसेच सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छतेबाबतचे शिष्टाचार पाळणे आवश्यक असल्याचे प्राचार्य रामदास थिटे यांनी सांगितले.
जातेगाव बुद्रुक येथील श्री संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात करोना विषाणूचा प्रसार रोखण्याबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्रा. शंकर भुजबळ यांनी करोना या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे खोकला, ताप, श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होता.
या आजाराचा प्रसार डोळे, नाक व तोंड याद्वारे होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष डफळ यांनी केले. विजय वरपे यांनी आभार मानले.