नेवासा, (प्रतिनिधी) – भेंडे (ता.नेवासा) येथील डाॅ.हरिष रामदास वाघमारे यांना संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित “सन्मान निष्ठेचा, गौरव कर्तृत्वाचा सन्मान महाराष्ट्राच्या गुणवंताचा” या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार सुधीर तांबे, चेअरमन डॉ.ज्ञानेश्वर सानप आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण क्षेत्रातील शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वृक्ष लागवड, संवर्धन व जनजागृती, पाणी बचत मोहीम,प र्यावरण संबंधित केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. नुकतीच त्यांनी पर्यावरण क्षेत्रातील डाॅक्टरेट पदवी मिळवलेली आह.
विशेष म्हणजे या पुरस्कार सोहळ्यात सर्वात कमी वयाचे शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कारार्थी हरीष वाघमारे हे एकमेव मानकरी ठरले आहेत. आजपर्यंत त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविले आहेत.