देहूरोड, (वार्ताहर) – देहूरोड येथील श्री शंकर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि युवा सेना मावळ तालुका यांच्या वतीने आयोजित मोफत नेत्र चिकित्सा आणि मोतीबंदू शस्त्रक्रिया शिबिराचा १०८ नागरिकांनी लाभ घेतला. यातील चार नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
कै. चंद्रभागा दांगट पाटील, कै. दशरथ बर्गे, कै.नारायण गळवे यांच्या स्मरणार्थ हे शिबिर घेण्यात आले. देहूरोड येथील शंकर मंदिरात डॉ. एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, हडपसर यांच्या सहकार्याने आयोजित शिबिराचे उद्घाटन देहूरोड पोलीस ठाण्यातील सहायक पोलिस निरिक्षक शंशाक कदम यांच्या हस्ते झाले.
शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, युवा सेना तालुका चिटणीस विशाल दांगट पाटील, शिवसेना विभाग प्रमुख सतिश मरळ, मंदिर ट्रस्टचे सचिव चिलुराम दांगट, खजिनदार परशुराम दांगट, श्रीरंग दांगट, गुन्हे शाखेचे ज्ञानेश्वर गाडेकर, गोपाळ ब्रम्हंदे, देवा कांबळे, सनी कदम, मेहेरबानसिंग तक्की, पोपट राक्षे, बाळासाहेब फाले, संतोष भोंडवे, सुनिल वाघमारे, मनिषा गळवे, यश गळवे आदी उपस्थित होते. डॉ. गणेश शिंदे, डॉ. आशिष जयस्वाल यांनी नेत्र तपासणी केली.
योगेश कोंढाळकर यांनी शिबिराला भेट दिली. शिबिर यशस्वी करण्यासाठी विजय दांगट, दीपक साबळे, शिवरंजन दांगट, लक्ष्मण दांगट, मयूर दांगट, आदित्य बारणे, ओंकार दांगट, सार्थक दौंडकर, अनिल भोसले यांनी परिश्रम घेतले.