दैनिक प्रभातचे ओंकार दळवी यांना युवा पत्रकार पुरस्कार
जामखेड – चांगले काम करणाऱ्यांची दखल समाज घेत असतो. वेगवेगळे पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही केला जात असतो. पुरस्कारामुळे पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीचा गौरव होतो, तर इतरांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. आमदार रोहित पवार यांच्या हस्ते दैनिक प्रभातचे तालुका प्रतिनिधी ओंकार दळवी यांना युवा पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शिवराणा युथ सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकारांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला, यावेळी मार्गदर्शन करताना आमदार पवार बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते प्रा. मधुकर राळेभात, सुर्यकांत मोरे, नगरसेवक डिंगाबर चव्हाण, पवन राळेभात, अमित जाधव, अमित गंभीर, गजानन फुटाणे, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, सुरज पवार, लहू पवार, दिपक तुपेरे, रवि सोनवणे, राजन समिंदर, मयूर भोसले, अमित जाधव, ताहेरभाई खान, राजू गोरे, सचिन देशमुख, सागर टकले, रवि साळुंके, सुर्यकांत पवार, विजय पवार, आकाश साळुंके, विकी साळुंके, शुभम पवार, मायकल साळुंके, दिनेश साळुंके, अल्ताब शेख, सोनु औचरे आदी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश खंडागळे, ओंकार दळवी, अविनाश बोधले, यासीन शेख, आशोक वीर, किरण रेडे, विजय जाधव, अनील कष्टेकर, रवींद्र भापकर यांना आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. आमदार पवार म्हणाले, चांगले कार्य करणाऱ्या पत्रकार, शिक्षक, प्रगतशील शेतकरी, पाणलोट क्षेत्रात कामकरणारे, पाण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार होणे अगत्याचेच आहे.