अवसरी – अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे बुधवार (दि. 15) आणि गुरुवार (दि. 16) या दिवशी होणारी काळभैरवनाथ यात्रा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द कराण्यात आली आहे, अशी माहिती श्री काळभैरवनाथ ट्रस्टच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात करोना विषाणूचे महाभयंकर संकट असल्यामुळे शासनाने तीस एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. शासनाच्या नियमाचा आदर करण्यासाठी शासनाचे नियम व आपल्या सुरक्षिततेसाठी या वर्षी यात्रा होणार नाही.
कोणीही मंदिर परिसरात गर्दी करू नये. सर्व ग्रामस्थांनी आपापल्या घरीच सण साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.