एसटी बसेसमध्येही उभारणार विलगीकरण कक्ष

पुणे – करोनाशी लढा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) आता करोनाग्रस्तांसाठी विलगीकरण कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) उभारणार आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातही करोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसत आहे. परिणामी, नायडूसह विविध रुग्णालयांमधील जागा अपुरी पडू लागली आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने विलगीकरण कक्षासाठी काही डब्यांमध्ये सोय केली असून, त्याच धर्तीवर एसटीचा पुणे विभागही सज्ज झाला आहे.

पुणे विभागातून धावणाऱ्या 3 हजार बसेसपैकी 30 बसेस गरज भासल्यास विलगीकरण कक्ष म्हणून वापरात येऊ शकतील, असेही संबंधित विभागाने सांगितले आहे. दरम्यान, करोना रुग्णांचा आकडा आणखी वाढल्यास एसटी प्रशासनाकडून विलगीकरण कक्षासाठी अन्यही बसेस उपलब्ध केल्या जाणार असून, शासनाला सर्वतोपरी मदत करण्यास एसटी महामंडळ सज्ज असल्याची माहिती देण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.