#AusvPak 1st Test : स्टार्कचा भेदक मारा; पाकिस्तानचा पहिला डाव २४० धावांवर गडगडला

ब्रिस्बेन : आॅस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यास आजपासून ब्रिस्बेन क्रिकेट मैदानावर सुरूवात झाली आहे. नाणेफेकीचा कौल बाजूनं लागल्यानंतरही पाकिस्तानच्या फलंदाजाना साजेशी कामगिरी करता आली नाही. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक मा-यासमोर पाकिस्तानचा पहिला डाव पहिल्याच दिवशी संपुष्टात आला. पाकिस्तानचा पहिला डाव २४० धावांवर गडगडला.

फलंदाजीमध्ये असद शफीफ वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. सलामीवीर शान मसूद आणि कर्णधार अझर अली यांनी सावध सुरूवात करत पहिल्या विकेटसाठी ७५ धावा जोडल्या. पण, पॅट कमिन्सनं शान मसूदला २७ धावांवर झेलबाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर स्टाॅर्क, हेझलवूड आणि लियाॅन यांनी पाकच्या मधल्या फळीला गुंडाळत पाकची ५ बाद ९४ अशी अवस्था केली. जोश हेझलवूडने अजहर अलीला ३९, स्टार्कने हारिस सोहैलला ०१, हेझलवूडने बाबर आजमला ०१ आणि नाथन लियाॅनने इफ्तिखार अहमदला ०७ धावांवर बाद केले.

त्यानंतर असद शफीफ, मोहम्मद रिजवान आणि यासिर शाह यांनी पाकचा डाव सावरला. असद शफीफने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. तर मोहम्मद रिजवानने ३७ आणि यासिर शाहने २६ धावा केल्या.

आॅस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मिचेल स्टाॅर्कने ५२ धावा देत सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. पॅट कमिन्सने ३, जोश हेझलवूडने २ आणि नाथन लाॅयनने १ विकेट घेतली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.