मेलबर्न: न्यूझीलंडने आॅस्ट्रेलियाविरूध्दच्या मालिकेतील ‘बाॅक्सिंग डे’ कसोटी क्रिकेट सामन्यात शुक्रवारी दुस-या दिवसअखेर पहिल्या डावात १८ षटकात २ बाद ४४ धावा केल्या होत्या. ते अजूनही ४२३ धावांनी पिछाडीवर आहेत. खेळ थांबला तेव्हा राॅस टेलर २ तर टाॅम लाथम ९ धावांवर खेळत होता. तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६७ धावांपर्यत मजल मारली.
Chance to BAT BIG tomorrow for these two! No doubt they will take up the challenge, we trail Australia by 423 runs 🏏
🏏 Latham 9*
🏏 Taylor 2*
🇳🇿 44/2 | https://t.co/N6jpmeRPFE#AUSvNZ #cricketnation pic.twitter.com/HvdILuC360— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 27, 2019
मेलबर्नमधील मेलबर्न क्रिकेट मैदानावर हा सामना सुरू आहे.आॅस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर ४ बाद २६७ धावांपर्यत मजल मारली होती. त्यात शुक्रवारी दुस-या दिवशी आॅस्ट्रेलियाला २१० धावांची भर घालता आली. प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडची सुरूवात चांगली झाली नाही. सहाव्याच (५.४) षटकात पॅट कमिन्सने टाॅम ब्लंडेलला १५ धावांवर टिम पेनकरवी झेलबाद केले. त्यानंतर जेम्स पैटिंसनने केन विलियमसनला ९ धावांवर पेनकरवी झेलबाद करत न्यूझीलंड संघास दुसरा धक्का दिला.त्यावेळी न्यूझीलंडची १२.२ षटकांत २ बाद ३९ अशी स्थिती झाली होती. त्यानंतर लाथम (०९) आणि टेलर (०२) यांनी डाव सावरला व शेवटपर्यंत पडझड होऊ दिली नाही आणि दिवसअखेर संघाची धावसंख्या ४४ पर्यत नेली.
DAY DONE at the MCG. We lose Tom Blundell and captain Kane before the close. Big day of batting tomorrow!
🏏 Latham 9*
🏏 Taylor 2*
🇳🇿 44/2 | https://t.co/N6jpmeRPFE#AUSvNZ #cricketnation pic.twitter.com/nSKmU1aARB— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 27, 2019
तत्पूर्वी, कालच्या ४ बाद २६७ वरून पुढे खेळताना शुक्रवारी आॅस्ट्रेलियाची सुरूवात चांगली झाली नाही. स्मिथला त्याच्या कालच्या धावसंख्येत फक्त ८ धावांची भर घालता आली. नील वैगनरने निकोल्सकरवी त्याला ८५ धावांवर झेलबाद केलं. त्यानंतर टिम पेन आणि हेडने संघाची धुरा संभाळत सहाव्या विकेटसाठी १५० धावा जोडल्या. टिम पेन ७९ धावांवर बाद झाला.
Neil Wagner gets his third!
A huge LBW appeal was followed by a successful review by New Zealand as Tim Paine departs for 79.#AUSvNZ pic.twitter.com/5ij1rfHhyd
— ICC (@ICC) December 27, 2019
त्यानंतर आॅस्ट्रेलियाचा एकही फलंदाज मैदानावर तग धरू शकला नाही आणि ३३ धावांत शेवटचे ४ फलंदाज माघारी परतले. यामध्ये मिचेल स्टार्क १ , पॅट कमिन्स ० , नाथन लायन १ धावांवर बाद झाले. ट्रॅव्हिस हेडने २३४ चेंडूत १२ चौकारासह ११४ धावांची खेळी केली तर जेम्स पॅटिसनने नाबाद १४ धावा केल्या.
A brilliant innings from Travis Head comes to an end as Neil Wagner sends him back for 114.
Batted, Head 👏#AUSvNZ pic.twitter.com/sQb2qpQMg0
— ICC (@ICC) December 27, 2019
न्यूझीलंडकडून नील वैगनरने ८३ धावांत ४, टिम साउदीने १०३ धावांत ३ , काॅलिन डी ग्रैंडहोमने ६८ धावांत २ तर ट्रेंट बोल्टने ९१ धावांत १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : आॅस्ट्रेलिया : पहिला डाव – १५५.१ षटकांत सर्वबाद ४६७( हेड ११४, स्मिथ ८५, पेन ७९, लबूशेन ६३, वाॅर्नर ४१, वेड ३८, नील वैगनर ४-८३, साउदी ३-१०३, ग्रैंडहोम २-६८, बोल्ट १-९१) विरूध्द न्यूझीलंड : पहिला डाव – १८ षटकांत २ बाद ४४ ( ब्लंडेल १५, विलियमसन ९, लाथम ९ आणि टेलर २ धावांवर खेळत आहे, पैंटिसन १-०९, कमिन्स १-०८).