मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, पोपटलाल आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
दरम्यान, आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका मराठी मध्ये येणार आहे. लवकरच या लोकप्रिय मालिकेचे मराठी डब व्हर्जन ‘फक्त मराठी’ या चॅनेलवर सुरु होणार आहे. ‘गोकुलधामची दुनिया’ असं या मालिकेचं मराठी व्हर्जन असणार आहे. त्यामुळे आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचं मराठी व्हर्जन कसं असणारा याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.