World Cup 2023 IND vs AUS Match : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी क्रिकेट विश्वचषकातील पाचवा सामना चेन्नई येथे खेळवला जात आहे. दोन्ही संघांना त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने करायची आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याचा हा निर्णय भारतीय गोलंदाजानी चूकीचा ठरवला आहे. भारतीय फिरकीसमोर ऑस्ट्रेलियानं लोटांगण घातलं आहे. रविद्रं जडेजा, कुलदीप यादव आणि आर. अश्विनच्या गोलंदाजीच्या समोर ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकात सर्वबाद 199 धावांच करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी केवळ 200 धावांचे आव्हान मिळालं आहे. मात्र, खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नाही. अशा स्थितीत भारताला थोडी सावधगिरी बाळगावी लागेल.
Innings break!
Australia are all out for 199 courtesy of a solid bowling performance from #TeamIndia 👏👏
Ravindra Jadeja the pick of the bowlers with figures of 3/28 👌👌
Scorecard ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #MeninBlue pic.twitter.com/TSf9WN4Bkz
— BCCI (@BCCI) October 8, 2023
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. बुमराहने टाकलेल्या चेंडूवर त्यांचा सलामीवीर मिशेल मार्श खाते उघण्यापूर्वीच परतला. हा झेल विराट कोहलीने अप्रतिमरीत्या घेतला. त्यानंतर डेव्हीड वॉर्नरने स्टीव्ह स्मिथच्या साथीत डाव सावरताना संघाचे अर्धशतक फलकावर लावले. वॉर्नर मात्र, स्थिरावलेला असताना 41 धावांवर बाद झाला. त्याने 52 चेंडूत 6 चौकार फटकावले. अर्धशतकाच्या जवळ आलेला असताना स्मिथही बाद झाला. त्याने 46 धावांच्या खेळीत 71 चेंडूत 5 चौकार फटकावले.
त्यानंतर मात्र, ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख फलंदाजांवर भारताच्या फिरकी त्रिकुटाने वर्चस्व राखले. जडेजाने त्यांची मधली फळी उध्वस्त केली. त्याच्या जोडीला कुलदीप यादव व रवीचंद्रन अश्विन यांनीही अफलातून भेदक मारा केला. मार्नस लेबुशेनने 27, ग्लेन मॅक्सवेलने 15 धावा करत थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला मात्र, अनावश्यक फटके मारत त्यांनी आपल्या विकेट फेकल्या. तळात मिचेल स्टार्क व कर्णधार पॅट कमिन्स यांनी उपयुक्त भागीदारी केली त्यामुळे ऑस्ट्रेलियाला भारतासमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान उभे करता आले. कमिन्सने 24 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावताना 15 धावा केल्या. स्टार्कने 35 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार मारताना महत्वपूर्ण 28 धावा केल्या.
दोन्ही संघाचं Playing 11 खालीलप्रमाणेे :-
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, अॅडम झाम्पा.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 12 सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने चार सामने जिंकले असून ऑस्ट्रेलियाने आठ सामने जिंकले आहेत. भारतीय भूमीवर वनडे विश्वचषकात दोन्ही संघ चार वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत.