Rajgad Fort – पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्यावर (Rajgad Fort) पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. यात जवळ पास 25 जणांचा मधमाशांनी चावा घेतलायं. किल्ल्यावरील सुवेळा माची परिसरात ही घटना घडलीय.
त्यातील एक पर्यटक माशा चावल्याने बेशुद्ध झालंय, तर इतर चार जणांना माशा चावल्यानंतर उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानं ते गंभीर जखमी आहेत. जखमींना वेल्हा पोलीस आणि स्थानिक यंत्रणेकडून स्ट्रेचरवरून गडावरून खाली आणण्यात आल आहे.
राजगडावर मधमाश्यांच्या हल्ल्यात पंचवीसहुन अधिक पर्यटक जखमी झाले आहेत. त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर असून जखमींना वैद्यकीय मदतीसाठी कडेकपारीतुन चढाई करत गडावरून खाली आणण्यात आलय.
काही जखमी पर्यटक गडावरुन स्वतः खाली उतरून आलेले आहेत. हा प्रकार सकाळी साडे आठ सुमारास राजगडाच्या आतिदुर्गम सुवेळा माचीवर घडला. मुंबई, पुण्यासह इतर ठिकाणचे चाळीसहून अधिक पर्यटक सुवेळा माची परिसरात भ्रमण करत होते.
त्यावेळी कड्याच्या कातर खडकातील भल्या मोठ्या आग्या मोहळाच्या माशांनी पर्यटकांवर हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी पर्यटक सैरावैरा पळत सुटले.
काही अरुंद पाऊल वाटेवर घसरून पडलेल्या पर्यटकांवर हल्ला करून मधमाश्यांनी चावा घेतला. त्यात पाच जण गंभीर जखमी झाले. राजगडावरील पुरातत्व खात्याचे पाहरेकरी बापु साबळे,
विशाल पिलावरे यांनी काही पर्यटकांच्या मदतीने जखमींना सुवेळा माचीवरुन बाहेर काढण्यासाठी धाव घेतली मात्र दुर्गम कडे कपारीतुन जखमींना स्टेचर तसेच मिळेल त्या साहित्याच्या आधाराने कसेबसे पदमावती माचीवरील आणण्यात आले.
त्यानंतर गडावरून खाली आणण्यात आलं. जखमींवर प्रशासनाकडून उपचार सुरू आहेत. पाहरेकरी बापु साबळे म्हणाले, मधमाश्यांनी चावा घेतल्याने काही जणांना उलट्या होऊन ते गंभीर झालेत तर एक जण बेशुद्ध पडला आहे.
वेल्हे तालुका तहसीलदार दिनेश पारगे यांनी, जखमी पर्यटकांना तातडीने उपचार मिळावे यासाठी शासकीय रुग्णवाहिकेचे तसेच जवळील डॉक्टरांना राजगडाच्या पायथ्याशी जाण्याच्या सुचना दिल्या आहेत.
त्यानुसार प्रशासनाने यंत्रणा सज्ज केली आहे. वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे यांच्या देखरेखीखाली गडावर पोलिस पथक दाखल झाले आहे.
सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे म्हणाले, परिसरातील पोलिस पाटील, पोलिस मित्र तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कार्यकर्त्यांनी राजगड परिसरात पोहचून मदत कार्य करण्यात येतंय.