अभिनेता – अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. ती लाइमलाइटपासून दूर असली तरी बी-टाऊनचा एक भाग असल्याने ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ती अनेकदा तिचा बेस्ट फ्रेंड ओरहान अवत्रामणीसोबत मस्ती करताना दिसते. अलीकडेच न्यासा ओरहान आणि त्याच्या पालकांसोबत डिनर करताना दिसली आहे. ओरहान म्हणजेच ऑरीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या डिनर डेटचा फोटो शेअर केला आहे.
ओरहानने न्यासा देवगनसोबत डिनर करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. ओरहानने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो त्याचे आई-वडील न्यासा आणि त्याचा मित्र वेदांत महाजन यांच्यासोबत डिनरचा आनंद घेताना दिसत आहे. यावेळी ओरहान आणि न्यासा दोघेही काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसले. ऑरी बेज पँटसह काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता, तर न्यासा काळ्या स्ट्रॅपलेस टॉप, व्हाईट सिल्क पॅंट, ग्लॅम मेकअप आणि खुल्या केसांनी खूप सुंदर दिसत होती.
सध्या हि डिनर डेट चांगलीच चर्चेत आली आहे. न्यासा आणि औरी अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री कि प्रेम आता सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली आहे. काही युजर्स ने अजय – काजोल चा होणार जावई म्हणून या पोस्ट कंमेंट्स केली आहे.