औरंगाबाद – औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या (दि. 8) जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांची सभा निर्विघ्न पार पडावी यासाठी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडून होमहवन करत पूजा करण्यात येत आहे. गेल्या 7 दिवसांपासून दौलताबादच्या दक्षिणमुखी मारुतीच्या मंदिरात ही पूजा सुरु आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी शिवसेनेकडून संपूर्ण तयारी झाली आहे.
11 ब्राम्हणांच्या उपस्थिततीत एक तारखेपासून हनुमंताची पूजा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेत कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी ही पूजा करण्यात येत आहे.
दौलताबादच्या दक्षिणमुखी मारुतीच्या मंदिरात ही पूजा सुरु आहे. पूजा करणाऱ्या ब्राम्हण वृंदांनी दावा केला आहे की, अशी पूजा केल्याने आलेले सर्व संकटे दूर होतात. सर्व कार्य आपल्या मनाप्रमाणे होतात. त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या सभेत सुद्धा कोणतेही अडचण निर्माण होऊ नयेत आणि सभा चांगली पार पडावी म्हणून पूजा केली जात असल्याची माहिती शिवसैनिकांनी दिली आहे.