लखनौ – समाजवादी पक्षाने स्वामी प्रसाद मौर्य यांचे नाव विधान परिषदेसाठी निश्चित केले आहे. बुधवारी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर सपाचे दुसरे उमेदवार करहलचे माजी आमदार सोबरन सिंह असतील. या व्यतिरिक्त अन्य दोन उमेदवारांची नावे विचाराधीन आहेत.
सपाकडे 111 आणि मित्रपक्षाकडे 14 आमदार आहेत. अशा स्थितीत सपा चार जणांना विधान परिषदेवर पाठवू शकते. सोमवारी पक्षाच्या हायकमांडकडून दोन नावांवर चर्चा झाली आणि इतर दोघांसाठी अनेक नेत्यांना प्रदेश कार्यालयात बोलावण्यात आले. मात्र पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांनी विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनाला हजेरी लावल्याने त्यांना कोणत्याही नेत्याची भेट घेता आली नाही.
समाजवादी पक्षाने विधान परिषद निवडणुकीसाठी स्वामी प्रसाद मौर्य यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मौर्य बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी मौर्य भाजप सोडून सपामध्ये दाखल झाले होते.