आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यास सरुवात झाली आहे. सोहळ्यानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरावर आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे.
रोषणाईत तयार करण्यात आलेले माऊली, तुकोबाराय, विठ्ठल भगवंत यांची चित्रे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
दरम्यान, शनिवारी श्रीगुरू हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने माऊलींच्या 725व्या संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
30 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी (आळंदी यात्रा) असून 2 डिसेंबरला माऊलींचा समाधी सोहळा आहे. 4 डिसेंबरला सोहळ्याची सांगता होणार आहे.