आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज 726वा संजीवन समाधी सोहळ्याला गुरुवारी (दि. 17) पासून सुरुवात होणार आहे. तर बुधवारी (दि. 23) सोहळ्याची सांगता होणार आहे. या सात दिवसांमध्ये माऊली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
कार्तिक वद्य अष्टमी गुरूवारी (दि. 17) पहाटे 3 ते 5 यावेळेत पवमान अभिषेक व दुधारती होईल. सकाळी 5 ते 11.30 भाविकांच्या महापूजा होतील. सकाळी 7 ते 9 वेळेत ह.भ.प. भाळासाहेब पवार आणि हैबतबाबा वंशजांच्या वतीने श्रीगुरु हैबतबाबांच्या पायरीची पूजा होईल. दुपारी 12.30 ते महानैवेद्य. सायंकाळी 6.30 ते 8 योगिराज ठाकूर यांच्या वतीने वीणा मंडपात कीर्तन होईल. नंतर 9 ते 11 बाबासाहेब आजरेकर यांच्यावतीने कीर्तन होईल. रात्री 9 ते 12 श्रींची मंदिरात पालखी प्रदक्षिणा होईल. रात्री 12 ते 12.30 धुपारती. 10 ते 12 वासकर महाराज यांच्या वतीने हैबतबाबांच्या पायरीपुढे जागर. 12 ते 2 मारुतीबुवा कराडकर यांच्या वतीने जागर. 2 ते 4 हैबतबाबा आरफळकर यांच्या वतीने जागर.
कार्तिक वद्य नवमी शुक्रवार (दि. 18) पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती. सकाळी 5 ते 11.30 भाविकांच्या महापूजा. दुपारी 12.30 ते 1 महानैवेद्य. सायं. 6.30 ते 8.30 बाबासाहेब देहूकर यांच्यावतीने वीणा मंडपात कीर्तन. रात्री 8.30 ते 9 धुपारती. रात्री 9.30 ते 11 बासकर महाराज यांच्यावतीने वीणा मंडपात कीर्तन.
कार्तिक वद्य दशमी शनिवार (दि. 19) पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व महापूजा. सकाळी 5 ते 11.30 भाविकांच्या महापूजा. दुपारी 12.30 ते 1 महानैवेद्य. दुपारी 4.30 ते 6.30 गंगुकाका शिरवळकर यांच्यावतीने वीणा मंडपात कीर्तन. सायं. 6.30 ते 8.30 धोंडोपंत दादा अत्रे यांच्यावतीने कीर्तन. रात्री 8.30 ते 9 धुपारती. रात्री 9 ते 11 वासकर महाराज यांच्यावतीने कीर्तन. रात्री 11.30 ते 12.30 वाल्हेकर महाराज यांच्या वतीने जागर.
कार्तिक वद्य एकादशी रविवार (दि. 20) रात्री 12 ते पहाटे 2 वेळेत 11 ब्रह्मवृंदाच्या वेदघोषात पवमान अभिषेक व दुधारती. दुपारी 12 ते 12.30 महानैवेद्य. दुपारी 1 वाजता श्रींची नगरप्रदक्षिणा. रात्री 8.30 धुपारती. रात्री 12 ते 2 मोझे यांच्यावतीने जागर.
कार्तिक वद्य द्वादशी सोमवार (दि. 21) पहाटे 2 ते 3.30 पवमान अभिषेक व दुधारती. पहाटे 3.30 ते 4 खेड तालुका प्रांत यांच्या हस्ते पंचोपचार पूजा. पहाटे 3 ते 6 नांदेडकर मंडळींची दिंडी क्र. 15 यांच्या वतीने मुक्ताई मंडपात काकडा भजन. सकाळी 5 ते 11.30 भाविकांच्या महापूजा. दुपारी 12.30 ते 1 महानैवेद्य. दुपारी 4 ते सायं. 7 रथोत्सव. दुपारी 4 ते 6 हरिभाऊ बडवे यांच्या वतीने वीणा मंडपात कीर्तन. रात्री 8.30 पालखीचे मंदिरात आगमनानंतर धूपारती.रात्री 9 ते 11 केंदूरकर महाराज यांच्या वतीने कीर्तन. रात्री 11 ते 12 श्रींचे गाभाऱ्यात पास धारकांसाठी खिरापत पूजा, प्रसाद वाटप. फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप.
कार्तिक वद्य त्रयोदशी मंगळवार (दि. 22) पहाटे 3 ते 4 वेळेत माऊली देवस्थानचे प्रमुख विश्वस्त यांच्या हस्ते पवमान अभिषेक व दुधारती. सकाळी 5 ते 9.30 भाविकांच्या महापूजा. सकाळी 7 ते 9 हैबतबाबा आरफळकर यांच्या वतीने हैबतबाबा पायरीपुढे कीर्तन. सकाळी 7.30 ते 9.30 वीणा मंडपात कीर्तन. सकाळी 7 ते 9 दाणेवाले निकम दिंडी यांच्या वतीने भोजलिंगकाका मंडपात कीर्तन. सकाळी 9 ते 11 तेथेच कीर्तन. सकाळी 10 ते दुपारी 12 नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन. सकाळी 9 ते 10 महाद्वारकाल्याचे कीर्तनानंतर हैबतबाबा दिंडीची समादी मंदिरात प्रदक्षिणा.
दुपारी 12 ते 12.30 माऊलींच्या 726 व्या संजीवन समाधी दिनानिमित्ताने घंटानाद, पुष्पवृष्टी, आरती व मान्यवरांना नारळप्रसाद. दुपारी 12.30 ते 1 महानैवेद्य. सायं. 6.30 ते 8.30 सोपानकाका देहूकर यांच्यावतीने कीर्तन. रात्री 9.30 ते 11.30 हरिभाऊ बागडे यांच्या वतीने कारंजा मंडपात भजन. रात्री 11.30 ते 12 धूपारती.
रात्री 12 ते 4 हैबतबाबा आरफळकर यांच्या वतीने जागर. कार्तिक वद्य चतुर्दशीसह अमावस्या बुधवार (दि. 23) पहाटे 3 ते 5 पवमान अभिषेक व दुधारती. सकाळी 5 ते 11.30 भाविकांच्या महापूजा. दुपारी 12.30 ते 1 महानैवेद्य. दुपारी 4 ते 6 मोझे यांच्यावतीने कीर्तन. रात्री 8 ते 8.30 धुपारती. रात्री 9.30 ते 12.30 श्रींचा छबीना. रात्री 12.30 शेजारती होईल.