आळंदी, (वार्ताहर) – श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये शिवसेना आळंदी शहरप्रमुख राहुल चव्हाण यांनी भाविकांना दूध आणि केळीचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून भाविकांची श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरासहा आसपासच्या मंदिराच्या दर्शनासाठी भाविक येतात. यावेळी माऊली मंदिरात दर्शन बारीमध्ये रांगेत उभा राहावे लागते सर्व भाविकांना थकवा जाणू नये व काहीतरी अल्पोहार म्हणून राहुल चव्हाण हे भाविकांना दूध व केळीचे वाटप करतात.
याप्रसंगी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, सचिन शिंदे, ज्ञानेश्वर घुंडरे, ज्ञानेश्वर गारकर, रोहित दोंदे, नितीन ननवरे, हिरामण तळेकर, रोहिदास कदम, किशोर देशपांडे, रवी कदम उपस्थित होते.