पुणे : महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रूग्णालयातून एका करोना संशयित रूग्णांने रविवारी पळून जाण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी असलेल्या पोलीस तसेच सुरक्षा रक्षकांनी हा रूग्ण पळून जात असताना, गेट बंद केले मात्र, हा रूग्ण गेटवरून उडी मारून बाहेर आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अडवून पुन्हा रूग्णालयात आले.
मात्र, या प्रकाराने सुरक्षा रक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला तर हा रूग्ण संशयित असून तपासणीसाठी त्याला आणण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.