खडकवासला फाट्यामध्ये उजनीतून पाण्यासाठी प्रयत्न

आमदार दत्तात्रय भरणे यांचा पाठपुरावा

निमसाखर- इंदापूर तालुक्‍यातील शेटफळगढेलगतच्या खडकवासला फाट्यामध्ये उजनी धरणातून पावसाळ्यात तलाव भरण्यासाठी उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी मिळावे, यासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. याबाबत भरणेंकडून प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन नुकतेच दिले. यात मात्र, पावसाळ्यातच तालुक्‍यातील तळी भरण्यासाठी याचा वापर होणार आहे. ही बाब शेतकऱ्यांना दिलासादायक आहे.

या प्रकल्पाचे सर्वेक्षण होणार असून पालकमंत्री पाटील यांच्या माध्यमातून आमदार भरणे हे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. उजनीतून पाणी उपसा योजनेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्‍यातील मोठ्या प्रमाणात शेततळ्यामध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शेततळ्यांवर मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्यांच्या योजना आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच तळ्यालगतच्या शेतीलासुध्दा फायदा होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×