बांधावरचा वाद महिला पोलीस पाटलांनी मिटविला

गोंतोडी येथील सपकळ आणि अडसूळ कुटुंबीय समाधानी

निमसाखर- गोंतोडी (ता. इंदापूर) येथील कदम वस्तीवरील दोन शेतकऱ्यांमधील अनेक वर्षांपासून सुरू असलेला जमिनीच्या बांधावरुनचा वाद गोतोंडीच्या महिला पोलिस पाटील राजश्री हरीभाऊ खाड यांच्या मध्यस्थीने संपुष्टात आला आहे. गोंतोडी हे गाव सुमारे चार हजार लोकसंख्या असलेले इंदापूर – बारामती रस्त्यालगतचे गाव आहे. येथीलच कदमवस्तीवरील गट नंबर 390 मधील सात एकरांतील जमीनीच्या बांधवावरून मीराबाई नानासाहेब सपकळ व अंजनाबाई ज्ञानदेव अडसूळ यांची मुले तानाजी ज्ञानदेव अडसूळ व शिवाजी ज्ञानदेव अडसूळ यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. अनेकवेळा वादावादी होऊन काही मिटत नव्हता. परंतु गोंतोडी गावच्या महिला पोलीस पाटील राजश्री हरीभाई खाडे इतर ग्रामस्थांनी मध्यस्थी करून दोन्ही शेतकऱ्यांमधील बांधावरून सुरू असलेला वाद मिटविला. ठराविक फूट अंतराचा नव्याने बांध तयार करून वाद संपुष्टात आणला. यावेळी कायमस्वरूपी या दोन्ही कुंटुबातील जमीनीच्या बांधावर सुरू असलेला वाद संपुष्टात आला.

यावेळी पोलीस पाटील राजश्री हरीभाऊ खाडे, बिभीषण नलवडे, दिलीप कदम, संपत कदम, संजय माने, तानाजी अडसूळ, मीराबाई सपकळ, प्रकाश सपकळ, नंदू सपकळ, हरीभाऊ खाडे, राजकुमार माने, राणी अडसूळ, रोहिणी अडसूळ यांसह सपकळ व अडसूळ कुंटुबातील सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)