लोणी काळभोर, (वार्ताहर) – विशे कॉम्पोनंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील सर्व मोठ्या कंपन्यांना सेवा पुरवते. त्यात विविध संशोधन व नाविन्यपूर्ण कामासाठी कंपनीला प्रतिभाशाली विद्यार्थ्यांची कायमच आवश्यकता असते. त्यामुळे या कराराचा आम्हाला व संशोधनाला मोठा फायदा होणार आहे, असे मत विशे कॉम्पोनंटचे मुख्य संचालक आर. आनंथक्रिश्नन यांनी व्यक्त केले.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचा इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन विभाग व ’विशे’ कॉम्पोनंट इंडिया प्रा लिमिटेड यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. ’विशे’ कॉम्पोनंट या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीतर्फे आता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच, प्रशिक्षण तसेच या इंटर्नशिप आदींसाठी मार्गदर्शन लाभणार आहे.
या सामंजस्य कराराप्रसंगी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड, ’विशे’ कॉम्पोनंटचे मुख्य संचालक आर. आनंथक्रिश्नन, अभिजित पिंपळे, नॅथानिअल मनिकम, स्कुल ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डॉ. विरेंद्र शेटे, अधिष्ठाता डॉ. सुदर्शन सानप, विभागप्रमुख डॉ. शुभांगी जोशी, डॉ. शंकर गंभीरे आदी उपस्थित होते. आनंथक्रिश्नन यांनी या सामंजस्य करारासाठी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांचे आभार मानले.
प्रा. डॉ. सुनिता कराड म्हणाल्या, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग एक अत्यंत चांगल्या प्रकारे विद्यार्थीकेंद्री काम करणारा आमचा विभाग असून सध्या आमचा टाटा मोटर्स, जॉन डिअर सारख्या कंपन्यांशी सामंजस्य करार आहे. त्यात आता ’विशे’ कॉम्पोनंटची भर पडल्याचा आनंदच आहे. तरी या करारातून आमच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या, संशोधनाच्या संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.