मंचर- पोखरी घाटानजीक असलेल्या अरुंद वळणावर समोरुन अचानक एसटी बस आल्याने वॅगनार कार रस्त्याशेजारील गटारात गेली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही, परंतु कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वॅगनार कारमधून तीन जण नाशिक येथून भीमाशंकर येथे दर्शनासाठी चालले होते. पोखरी घाटानजीक असलेल्या अरुंद वळणावर अचानक एसटी बस आल्याने कार गटारात गेली. कारचा वेग कमी असल्याने कोणालाही दुखापत झाली नाही, परंतु यामध्ये कारच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे. घाटातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे लहान-मोठे अपघात होत असल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले.