मुंबई – पंजाबस्थित 30 वर्षीय दहशतवादी चरतसिंग उर्फ इंद्रजितसिंग करिसिंग याला महाराष्ट्र एटीएसने मुंबईत अटक केली आहे. त्याला पुढील आवश्यक कारवाईसाठी पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. कॅनडामधील वॉंटेड दहशतवादी लखबीर सिंग लांडायाच्या संपर्कात असल्याचे उघड झाले आहे.
दहशतवादी चरतसिंग उर्फ इंद्रजीतसिंग करिसिंग हा सहा वर्षांपूर्वी भारतातून कॅनडाला फरार झाला होता. तो मूळचा तरनतारन जिल्ह्यातील हरिकेचा रहिवासू असून तो कॅनडातून आपले नेटवर्क चालवत होता. तो हेरॉईन व इतर अंमली पदार्थांबरोबरच शस्रांचीही तस्करी करत असे. याशिवाय तो भारतात आपल्या साथीदारांच्या मदतीने पंजाबमधील व्यावयासीकांडून खंडणी वसूल करत असल्याने त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.