सिडनी : एटीपी कप टेनिस स्पर्धेस शुक्रवारपासून सुरूवात होणार असून ही स्पर्धा सांघिक प्रकाराची असणार आहे.या स्पर्धेपासून यदांच्या जागतिक टेनिस मोसमाची सुरूवात होत आहे.
या स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील अव्वल ३० मधील जवळपास सर्व टेनिसपटू सहभागी होणार असून यामध्ये नोव्हाक जोकोविच, रफाएल नदाल अशा दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. तर या स्पर्धेतून राॅजर फेडरर, अँडी मरे, केई निशिकोरी या अव्वल खेळाडूंनी दुखापतीमुळं माघार घेतली आहे.
Welcome to our 24 #ATPCup captains!
From 6 groups across 3 cities, one will lead their country to the 🏆#Brisbane | #Perth | #Sydney pic.twitter.com/Jk6fzWs4XM
— ATPCup (@ATPCup) January 1, 2020
आॅस्ट्रेलियातील पहिल्या जागतिक सांघिक टेनिस स्पर्धेचा कालावधी ३ ते १२ जानेवारी असून यामध्ये २४ संघ सहभागी होणार आहेत. या संघाची सहा गटात विभागणी केली असून प्रत्येक गटात ४ संघ असतील. प्रत्येक संघ ३ लढती खेळेल. एका लढतीत प्रत्येक संघ तीन सामने खेळतील. सांघिकमध्ये २ एकेरी आणि १ दुहेरीची लढत होईल. त्यातील दोन सामने जिंकावे लागतील. गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल होतील.
आॅस्ट्रेलियातील ब्रिस्बेन, पर्थ आणि सिडनी या शहरांत सेपर्धेचे सामने होतील. विजेत्या संघाना १५ दशलक्ष अमेरिकन डाॅलर पारितोषिक मिळणार आहे. त्याचबरोबर टेनिसपटूंना या स्पर्धेव्दारे एकेरीत ७५० ते दुहेरीत २५० गुणांपर्यत कमाई करण्याची संधी आहे.