न्हावरे : न्हावरे येथील बँक ऑफ इंडियाची एटीएम सेवा अनेक वेळा बंद असते. त्यामुळे नागरिकांना अनियमित एटीएम सेवेमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बहुसंख्य नागरीक सुरक्षितेमुळे रोख रक्कम सोबत बाळगण्याऐवजी एटीएम कार्ड वापरत आहेत आणि ते वापरणे सुरक्षित आहे. मात्र,महिन्यात जास्तीत-जास्त वेळा गावातील कोरेकर कॉम्प्लेक्स येथील बँक ऑफ इंडियाची एटीएम सेवा बंद असते. त्याचप्रमाणे घोडगंगा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील एटीएम मध्ये कॅश उपलब्ध नसल्यामुळे पैसे काढण्यासाठी एटीएम मध्ये येणाऱ्या ग्राहकांचा अनेकदा भ्रमनिराश होत आहे.
त्यामुळे बँक ऑफ इंडियाने कोरेकर कॉम्प्लेक्स व घोडगंगा सहकारी साखर कारखाना येथील एटीएम सेवा नियमित सुरू ठेवावी. अशी मागणी ग्राहकांनी केली आहे