जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ६८९ वर
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील २० जणांचा करोना रिपोर्ट बुधवारी रात्री उशिरा पाँझिटिव्ह आला. आज सकाळी २० जण पाँझिटिव्ह आले. त्यामुळे दिवसभरात ४० तर आतापर्यंत करोनाग्रस्तांची संख्या ६८९ झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील विविध करोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालयात संशयितत म्हणून दाखल असलेल्या २० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
यामध्ये खंडाळा तालुक्यातील आसवली येथील २५ वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील जांभेकरवाडी येथील ३० वर्षीय पुरुष, महाबळेश्वर येथील २९ वर्षीय महिला, जावली तालुक्यातील भणंग येथील २१ वर्षीय पुरुष व २४ वर्षीय महिला, धोंडेवाडी येथील ६३ पुरुष, ५७ वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील पिंपळवाडी धावडशी येथील १५ वर्षीय मुलगी व १२ वर्षीय मुलगा, शाहुपुरी सातारा येथील ५८ वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील व्याजवाडी येथील २७, २९ वर्षीय पुरुष व २२ वर्षीय महिला, पाचवड येथील ३९ वर्षीय महिला, १३व १६ वर्षाच्या मुली, वेळे येथील ५९ वर्षीय पुरुष ,माण तालुक्यातील गोंदवले ब्रुद्रुक येथील ६३ वर्षीय महिला, खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथील २४ वर्षीय पुरुष व गुरसाळे येथील ३९ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.