Bollywood : गायक आतिफ असलमला परिचयाची गरज नाही. आपल्या सुरेल आवाजाने त्याने जगाला वेड लावले आहे. चित्रपटांमध्ये गाण्याव्यतिरिक्त, आतिफ जगभर फिरतो आणि लाइव्ह कॉन्सर्ट करतो. अशाच एका कॉन्सर्टमध्ये आतिफ असलमसोबत असे काही घडले, ज्यानंतर त्याने शो मध्येच थांबवला.
I love how he refuses to even touch the money #atifaslam pic.twitter.com/r0syjfrgQY
— Aish (@ashwrymthws) October 24, 2023
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आतिफ स्टेजवरून परफॉर्मन्स देत आहे. आतिफच्या ‘क्या से क्या हो गये’ या गाण्यावरही लोक नाचत आहे, अशात एका व्यक्तीने त्याच्यावर नोटा फेकण्यास सुरुवात केली. आतिफला हे अजिबात आवडले नाही. त्याने गाणे बंद केले आणि ऑर्केस्ट्राही बंद केला.
आतिफने गाणे थांबवले आणि पैसे फेकणाऱ्या व्यक्तीकडे गेला आणि म्हणाला,’माझ्या मित्रा, हे पैसे माझ्यावर फेकण्यापेक्षा हे पैसे कुणाला तरी दान करणे योग्य राहील. मला माहित आहे की तू खूप श्रीमंत आहे. मी तुझे कौतुक करतो. पण पैशाचा असा अनादर करू नको.
आतिफच्या या व्हिडिओने त्याचे चाहते आणि सोशल मीडिया यूजर्स खूप इम्प्रेस झाले आहे. व्हिडीओ शेअर करताना आतिफचा चाहता आणि पाकिस्तानी गायक आगा अलीने लिहिले की, ‘केवळ एक दिग्गजच हे करू शकतो.’ अनेक सोशल मीडिया युजर्सनी लिहिले की आतिफने त्या व्यक्तीला ज्या प्रकारे समजावून सांगितले ते खरोखरच कौतुकास्पद आहे.
आतिफ हा पाकिस्तानचा सुपरस्टार गायक आहे. त्याने बॉलिवूडमध्येही आपल्या आवाजाची जादू पसरवली आहे. आतिफच्या आवाजातील अनेक बॉलिवूड गाणी ब्लॉकबस्टर ठरली. आतिफला पाकिस्तानात जेवढे प्रेम मिळाले तेवढेच प्रेम भारतातही मिळाले. पार्श्वगायनासोबतच आतिफने अभिनयातही हात आजमावला आहे. तो पहिल्यांदा बोल या पुरस्कार विजेत्या चित्रपटात अभिनय करताना दिसला होता. आता बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी गायकांच्या गाण्यावर बंदी आल्याने आतिफचा आवाज चित्रपटांमध्ये ऐकू येत नाही.