Bollywood : ‘गदर 2’ चित्रपटाच्या यशानंतर सनी देओल आता नव्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाला आहे. सनी देओल हा बॉलीवूडचा अॅक्शन किंग आहे आणि तो स्वत:च्या बळावर चित्रपट खेचून आणण्यात यशस्वी ठरतो, हे गदर २ चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले.
‘गदर 2’ नंतर त्याच्याकडे सातत्याने अनेक मोठे प्रोजेक्ट्स येत आहेत. या मालिकेत सनी पाजी नितीश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटाचाही प्रस्ताव आहे, ज्याचा तो गांभीर्याने विचार करत आहे. नितेशने सनी पाजीला चित्रपटातील ‘हनुमानाच्या’च्या भूमिकेसाठी मोठी फी ऑफर केली आहे.
ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या, पण चित्रपटाचे नशीबच खराब झाले. प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान यांचा हा चित्रपट आपत्तीजनक ठरला. अशात जेव्हा नितीश तिवारी यांनी ‘रामायण’ बनवण्याची घोषणा केली तेव्हा प्रेक्षकांच्या मनात प्रश्न होता की, यावेळी त्यांना काही चांगलं पाहायला मिळणार का? मात्र, ट्रेड अॅनालिस्ट्सवर विश्वास ठेवला तर ‘दंगल’सारखे चित्रपट देणारा नितीश प्रेक्षकांना नक्कीच एक खास अनुभव देईल.
नितेशने ‘रामायण’साठी सनी देओलला मोठी फी देऊ केली आहे. रिपोर्टनुसार, नितीशने या चित्रपटासाठी सनीला 45 कोटी रुपये फीचा प्रस्ताव ठेवला आहे. ‘हनुमाना’च्या भूमिकेसाठी नितीशची पहिली पसंती सनी देओल आहे. अशात त्याने हे पात्र साकारावे असे त्यांना वाटते. वृत्तानुसार, ‘रामायण’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सनी दुसरा कोणताही चित्रपट घेणार नाही. नितीश यांच्या चित्रपटासाठी तो पूर्ण वेळ घालवणार आहे. चित्रपटातील स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, रामच्या भूमिकेसाठी रणबीर कपूर आणि सीतेच्या भूमिकेसाठी साऊथ अभिनेत्री साई पल्लवीची चर्चा आहे.