छत्रपती संभाजी नगर – ईएमएमटीसी तर्फे आयोजित व एटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली ईएमएमटीसी – एमएसएलटीए १४ वर्षाखालील एटीएफ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये देशभरातून मुले व मुली दोन्ही गटात १२० हुन अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा ईएमएमटीसी टेनिस कॉम्प्लेक्स छत्रपती संभाजी नगर येथे १४ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत रंगणार आहे.
स्पर्धेत मुलींच्या गटात ओडिशाच्या अहाना हिला, तर मुलांच्या गटात तामिळनाडूच्या प्रणित रेड्डी याला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, मराठवाड्यात अधिकधिक टेनिस कोर्ट, प्रशिक्षक, खेळाडूंमध्ये टेनिसचा होत असलेला प्रसार बघुन आम्हांला खूप आनंद झाला आहे.
औरंगाबाद येथे नुकतीच १४ वर्षाखालील एआयटीए टेनिस स्पर्धा, १६ वर्षाखालील गटातील आशियाई मानांकन टेनिस स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. एकापाठोपाठ आयोजित करण्यात येत असलेल्या या स्पर्धांमुळे औरंगाबाद मधील खेळाडूंना महत्वपूर्ण गुण मिळवण्याची संधी मिळणार आहे.
BWF Malaysia Open 2024 : सात्विक-चिरागची विजयी घौडदौड कायम, अंतिम फेरीत मारली धडक…
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना करंडक व २०० एटीएफ गुण तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक व १३३ एटीएफ गुण देण्यात येणार आहेत. स्पर्धा संचालक वर्षा जैन असणार असून या स्पर्धेसाठी वैशाली शेकटकर यांची एआयटीए सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे., प्रवीण प्रसाद आणि प्रविण गायसमुद्रे यांची या स्पर्धेसाठी मुख्य रेफ्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.