सहायक पोलीस निरीक्षक कदम शौर्यपदकाने सन्मानित

रांजणगाव गणपती – रांजणगाव एमआयडीसी (ता. शिरुर) येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांना पोलीस दलातील खडतर सेवा व उत्कृष्ट कामगिरीबद्दल नुकतेच राष्ट्रपती शौर्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले.

सहायक पोलीस निरीक्षक कदम यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते शौर्यपदक प्रदान करण्यात आले. मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालय सभागृहात हा सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, रणजित पाटील, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल उपस्थित होते. सहायक पोलीस निरीक्षक कदम यांनी यापूर्वी गडचिरोली येथे कार्यरत असताना 6 नक्षलविरोधी चकमक घडवून आणण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. कदम यांना यापूर्वी विशेष सेवा पदक, आंतरिक सेवा पदक व पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पुरस्काराने गौरविले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.