परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी अमेरिकेला पुन्हा ठणकावले
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मिरच्या प्रश्नावर वक्तव्य करत या प्रकरणाला हात घातला आहे. परंतु, काश्मीरचा मुद्दा हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आहे त्यामुळे याप्रकरणी भारत फक्त पाकिस्तानशीच चर्चा करेल असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेला पुन्हा एकदा ठणकावले आहे. शुक्रवारी अमेरिकेचे आणि भारताचे परराष्ट्र मंत्री बॅंकॉक या ठिकाणी बैठकीसाठी एकत्र आले होते. त्यावेळीच एस. जयशंकर यांनी माइक पोम्पिओ यांना हे उत्तर दिले आहे.
काश्मीरप्रश्नी जी काही चर्चा करायची असेल ती आम्ही करु आम्हाला कुणाच्याही मध्यस्थीची आवश्यकता नाही असे जयशंकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, मोदींची इच्छा असेल तर मी काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करु शकतो असे ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यांचे हे ट्विट आजच समोर आले. ज्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काश्मीरप्रश्नी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नसल्याचे सांगत ट्रम्प यांची ऑफर धुडकावून लावली आहे.