सहायक आयुक्तांना लाच घेताना अटक

सातारा – चॉकलेट व बिस्कीट विक्रीच्या व्यवसायासाठी अन्न व औषध विभागाचा दाखला देण्यासाठी लाच मागणाऱ्या सहायक आयुक्तांना चार हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. शिवकुमार बाबुराव कोडगिरे असे अटक केलेल्या सहायक आयुक्तांचे नाव असून त्यांच्यावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराचा चॉकलेट व बिस्कीट विक्रीचा व्यवसाय असून त्यासाठी आवश्‍यक दाखला देण्यासाठी शिवकुमार कोडगिरे यांनी चार हजार रूपयांची मागणी केली होती. त्या विरोधात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता. त्यानुसार गुरूवारी दि. 25 रोजी साताऱ्यातील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात शिवकुमार कोडगिरे यांना चार हजार रूपये रोख स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर कोडगिरे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधिक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक अशोक शिर्के, सहायक फौजदार आनंदराव सपकाळ, भरत शिंदे, विजय काटवटे, संजय साळुंखे, अजित कर्णे, विशाल खरात, संभाजी काटकर, तुषार भोसले यांनी केली. दरम्यान, लाच मागणीसंबधी नागरिकांच्या तक्रारी असल्यास पोलीस उपअधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ, सदरबझार सातारा) येथे संपर्क साधावा. त्याचबरोबर (02162) 238139 अथवा 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीला मुंबईत खिंडार विकासाचे स्वप्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)