आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सिंधू, सायना, समीरची उपांत्य फेरीत धडक

वुहान (चीन)  – भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि समीर वर्मा यांनी शानदार प्रदर्शन कायम राखत आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये गुरुवारी महिला आणि पुरुष गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. चौथ्या मानांकित सिंधूने 33 मिनिटांतच सामना जिंकून विजयी आगेकूच केली. आता तिचा सामना चीनच्या बिगरमानांकित कॉय यानयान हिच्याची होणार आहे.

लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती सायना नेहवालनेही दुसऱ्या फेरीत दमदार प्रदर्शन केले. सायनाने कोरियाच्या किम गा युनचे आव्हान 38 मिनिटांतच संपुष्टात आणले. सातव्या मानांकित सायनाचा पुढील सामना तिसऱ्या मानांकित अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. स्पर्धेतील अन्य सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूने इंडोनेशियाच्या चोईरुनिसा हिचा 21-15, 21-19 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

पुरुष एकेरीत समीर वर्मा याने स्पर्धेतील विजयी धडाका कायम राखला आहे. दुसऱ्या फेरीत त्याने हॉंगकॉंगच्या नाका लॉंग ऍज्युसवर 21-12, 21-19 असा सहज विजय मिळविला. मिश्र दुहेरीत भारताच्या उत्कर्ष अरोरा आणि करिष्मा वाडकर यांचे आव्हान संपुष्टात आले. इंडोनेशियाच्या हाफिज फैजल आणि ग्लोरिया इमॅन्युले यांनी 21-10, 21-15 असा विजय मिळविला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.