वरुण धवनचे लग्न होणार सिंधी रिवाजांनुसार

वरुण धवन आणि त्याची लहानपणची गर्लफ्रेंड नताशा दलाल यांच्यात पहिल्यापासून डेटिंग सुरू आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांची ही खास दोस्ती अगदी काही महिन्यांपूर्वीच जगजाहीर झाली आहे. या वर्षी 7 नोव्हेंबरला हे दोघेजण लग्न करणार आहेत, असेही समजले होते. त्यांच्या लग्नाविषयी आणखीही महत्वाची माहिती पुढे आली आहे.

वरुण आणि नताशा दोघांनाही आपल्या लग्नाला आणखी उशीर करायचा नाही आहे. म्हणून दोघांच्या कुटुंबीयांनी याच वर्षी यांचा बार उडवून द्यायचा असे ठरवले आहे. यांचे लग्न सिंधी रिती रिवाजांनुसार खास ठिकाणी केले जाणार आहे. वरुणचा “कलंक’ अलिकडेच रिलीज झाला आणि आपटला देखील. त्याशिवाय “स्ट्रीट डान्सर 3’च्या शुटिंगमध्येही वरुण धवन बिझी आहे. हा सिनेमा याच वर्षी 8 नोव्हेंबरला म्हणजे लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रिलीज होणार आहे. गोविंदाच्या “कुली नं 1’च्या रिमेकमध्येही वरुण धवन काम करतो आहे. त्याच्या गर्लफ्रेंडला त्याने आतापर्यंत लाईम लाईटपासून दूरच ठेवले होते. मात्र त्यांचे डेटिंग गॉसिपवाल्यांच्या नजरेतून सुटले नाही आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे गुपित बाहेर आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.