#AsiaCup2023 Super-4 #INDvPAK : विराट कोहली आणि केल राहुल यांच्या शानदार शतकी तर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं 50 षटकांत 2 बाद 356 धावा केल्या असून पाकिस्तानसमोर 357 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यात रविवारी पावसाने खोडा घातल्याने उर्वरित सामना सोमवारी खेळवण्यात आला. रविवारच्या 2 बाद 147 धावांवरून पुढे खेळ सुरू होण्यापूर्वीच पुन्हा एकदा पावसाने खेळ केला. त्यामुळे सामना उशिरा सुरु झाला.
भारताकडून विराट कोहलीने 94 चेंङूत सर्वाधिक 122 आणि लोकेश राहुलने 106 चेंङूत 111 धावा केल्या. दोन्ही फलंदाज शतके झळकावून नाबाद राहिले.
राहुलने आपल्या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार लगावले तर विराट कोहलीने 9 चौकार आणि 3 षटकार लगावले. या दोघांपूर्वी रोहित शर्मा 49 चेंङूत 56 धावा करून बाद झाला तर शुभमन गिल 52 चेंङूत 58 धावा करून बाद झाला.
विराट कोहलीने 84 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. हे त्याचे वनडेतील 47 वे शतक आहे. यासोबतच त्याने कोलंबोच्या मैदानावर सलग चौथ्या डावात शतक झळकावले आहे.तसेच विराट कोहलीने वनडेमध्ये 13000 धावा पूर्ण केल्या आहेत. सर्वात कमी डावात 13000 धावा पूर्ण करणारा तो फलंदाज ठरला आहे.
लोकेश राहुलने 100 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने पुनरागमन करत दमदार खेळी केली. हे त्याचे वनडेतील सहावे शतक आहे.
पाकिस्तानकडून शादाब खान आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी एक विकेट घेतली. शादाब खान याने 10 षटकांत 71 आणि शाहीन आफ्रिदीनं 10 षटकांत 79 धावा दिल्या.