नवी दिल्ली – अभिनेता अल्लू अर्जुन सध्या त्याच्या आगामी ‘पुष्पा 2’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच आतुरता लागली आहे. दोन वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या पुष्पा या चित्रपटाद्वारे अल्लू अर्जुनने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेले आहे.
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने देशभर चांगलाच धुमाकूळ घातला. गरीब पण ऍटिट्यूड असलेला पुष्पा सर्वांनाच खूप आवडला. परिस्थितीने केलेला अन्याय आणि इनलिगल व्यवसाय करणारा पुष्पा पहिल्या पार्टमध्ये सर्वांसाठी हिरो होता.
अभिनेत्री रश्मीका मंदनाने देखील या चित्रपटात अल्लूसोबत दमदार भूमिका साकारली होती. म्हणूनच आता चाहत्यांना दुसऱ्या पर्वाचे वेड लागले आहे. अश्यातच, आता ‘पुष्पा 2’चे आणखी एक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
August 15th 2024!!!#Pushpa2TheRule pic.twitter.com/YHynsXLPB4
— Allu Arjun (@alluarjun) September 11, 2023
अल्लू अर्जुनने ट्विट केले आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुनचा हात सोन्याच्या बांगड्या आणि अंगठ्याने सजलेला दिसतो आहे. लाल नेल पेंट सर्वात लहान बोटावर दिसतो आणि बोटांवर रक्ताचे डागदेखील देखील दिसत आहेत. सध्या चित्रपटाचे हे पोस्टर सगळीकडे व्हायरल होत असून, नेटकरी देखील कमेंटचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, ‘पुष्पा’ चित्रपटाने फक्त देशातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक करण्यात आलं होतं. त्याने या भूमिकेसाठी अफाट मेहनत घेतली होती. त्याला पहिल्यांदा या रुपात पाहून चाहते थक्क झाले होते. त्याची स्टाईल आणि ऍटिट्यूड पाहून सगळेच त्याचे फॅन्स झाले होते.