Live Cricket Score Today, Asia Cup 2023 India vs Sri Lanka : आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीतील भारतीय संघाचा दुसरा सामना श्रीलंकेशी आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करायचे आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचाही हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न असेल. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
91 धावांवर भारताची तिसरी विकेट पडली. रोहित शर्मा अर्धशतक झळकावून बाद झाला आहे. दुनिथ वेलल्गेने त्याला क्लीन बोल्ड केले. रोहितने 48 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. या सामन्यात डुनिथ वेलल्गेने एकहाती टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले आहे. त्याने सलग तीन षटकांत भारताच्या तीन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केले. आता इशान किशन आणि लोकेश राहुल क्रीजवर आहेत. 16 षटकांनंतर भारताची धावसंख्या 93/3 आहे.
रोहित शर्माने 44 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील 51 वे अर्धशतक आहे. या डावात त्याने 10 हजार वनडे धावाही पूर्ण केल्या.
भारताची पहिली विकेट 80 धावांवर पडली. शुभमन गिल 25 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. दुनिथ वेलल्गेने त्याला क्लीन बोल्ड केले.
भारताची दुसरी विकेट 90 धावांवर पडली. विराट कोहली 12 चेंडूत तीन धावा करून बाद झाला. ड्युनिथ वेलालगेच्या चेंडूवर तो दासुन शनाकाकरवी झेलबाद झाला.