India vs Pakistan Highlights, Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय होल्टेज सामना हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक प्रसिद्धी मिळणारा असतो. स्टेडियम्स सहसा दोन्ही देशांच्या प्रेक्षकांनी खचाखच भरलेली असतात, मात्र आजच्या सामन्यात मैदानावरील अनेक स्टॅंड रिकामे असल्याने उलट चित्र पाहायला मिळाले.
भारत आणि पाकिस्तान या संघातील सामना असेल तर चाहते अक्षरशः तिकीटांवर तुटून पडतात. स्टेडिअमवर कुठेही रिकामी जागा नसते. परंतू पाल्लेकेलेमधील चित्र सर्वांच्या भूवया उचविणारे होते.
अधिक माहितीनुसार, सुरुवातीला सामन्यासाठी किमान तिकिटाची किंमत 20 डॉलर्स (सुमारे 6400 श्रीलंकन रुपये) इतकी होती, परंतु नंतर ती 1500 श्रीलंकन रुपयांवर ती कमी करण्यात आली. यासह, भारताच्या नेपाळविरुद्धच्या सामन्याच्या तिकीटांवरही मोठी सूट देण्यात आली मात्र तरीही प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.