Asian Cup 2023 Final | शनिवारी रात्री खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अक्रम अफिफच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर कतारने जॉर्डनचा 3-1 असा पराभव करत आशिया कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. यासह सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला आहे. विशेष म्हणजे अफिफने तिन्ही गोल पेनल्टीवर केले. त्याने 22व्या, 73व्या आणि 90+5व्या मिनिटाला गोल केले.
त्याचवेळी, जॉर्डनसाठी एकमेव गोल याझान अब्दुल्ला अलनैमत याने 67व्या मिनिटाला केला. अफिफने स्पर्धेत आठ गोल केले. आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत हॅट्ट्रिक करणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्याचबरोबर कतारचा संघ या सामन्यात आणखी गोल करू शकला असता, पण जॉर्डनचा गोलरक्षक याझिदने दोन गोल वाचवून आणखी गोल होऊ दिले नाही.
Argentina tour of China : मेस्सीची कृती अर्जेंटिनाला चांगलीच पडली महागात…
दरम्यान, ही स्पर्धा जिंकणारा कतार हा आठवा यजमान देश आहे. जपानने 2000 आणि 2004 मध्ये सलग आशियाई चषक जिंकला होता. त्यानंतर, कतार हा सलग विजेतेपद (2019, 2024) पटकावणारा पहिला देश ठरला.