मुंबई – येत्या 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुल यांचं मोठ्या कालावधीनंतर संघात पुनरागमन झालं आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि संघ निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन विविध बांबीवर भाष्य केलं. आशिया चषक म्हणजे विश्वचषकाची रंगीत तालीमच होय.
30 ऑगस्ट 2023 ते 17 सप्टेंबर 2023 या दरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. यासाठी आता भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, कोणत्या शिलेदारांना संघात स्थान देण्यात आले आहे, ते पाहूया…
आशिया चषकासाठी भारताचा संघ पुढील प्रमाणे….
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप विकेटकिपर)