Ashok Chavan Security । भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. चव्हाणांना येणाऱ्या धमक्यांचा आधार घेत त्यांची सुरक्षा ‘वाय-प्लस’ श्रेणीसुधारित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती शासनाच्या सुरक्षा अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.
राज्य पोलिसांनी चव्हाण यांच्या मुंबईतील निवासस्थानी आणि त्यांच्या मूळ गावी नांदेड येथेही सुरक्षा वाढवली आहे, असेही अधिकाऱ्यांच्या माहितीतून समजत आहे. चव्हाण यांना यापूर्वी ‘वाय’ श्रेणीचे सुरक्षा कवच होते.
आता चव्हाण यांना मिळणाऱ्या ‘वाय-प्लस’ कव्हरमध्ये दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
त्यानंतर त्यांना भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आणि मंगळवारी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.