Meaning of ‘Akaay’, name of Virat -Anushka’s Second child : स्टार क्रिकेटर विराट कोहली ( Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने ( Anushka Sharma ) चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे, विरुष्काच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालंय. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा पालक बनले आहेत. अनुष्का शर्माने एका मुलाला जन्म दिला आहे.
“15 फेब्रुवारी 2024 रोजी आम्ही आमच्या दुसऱ्या बाळाचं अर्थात वामिकाचा लहान भाऊ ‘अकाय’चं स्वागत केलं” अशी पोस्ट सोशल मीडियावर करत अनुष्काने दुसऱ्या मुलाच्या आगमनाची माहिती दिली .
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मुलाचे नाव ‘अकाय’ असे ठेवलं आहे. पण या नावाचा अर्थ काय? ‘अकाय’ हे नाव सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत आहे. अनेक जण विराट आणि अनुष्काच्या मुलाच्या नावाचा अर्थ जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. तथापि, विराट आणि अनुष्काने मुलाचे अकाय असे नाव ठेवण्यामागील काय कारण आहे याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.
अनेक सेलिब्रिटी आपल्या मुलांची यूनिक नावे ठेवतात. या यादीत विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचाही समावेश आहे. हिंदी शब्दकोशानुसार, ‘अकाय’ म्हणजे ‘निराकार’. कोणताही आकार, रूप नसलेल्याला निराकार म्हटलं जातं.
‘अकाय’ हा शब्द मुळचा तुर्की शब्द आहे. तुर्की भाषेत याचा एक अर्थ ‘चंद्राचा प्रकाश किंवा चंद्राकडून आलेला प्रकाश’ तसेच ‘चमकणारा तारा’ असाही होतो. एकंदरीतच विराट-अनुष्काच आयुष्य प्रकाशमय करणारा ‘अकाय’ असं देखील म्हटलं जाऊ शकते.
अकाय या शब्दाचा अर्थ एकता असा देखील होतो. हा शब्द संस्कृत शब्द “ऐक्य आणि काया” पासून तयार झाला आहे. या शब्दाचा दुसरा अर्थ “अमार्यादित शक्ती” असा देखील होतो.
तसेच अनेकजण आजका मुलांची नावे त्यांच्या आवडत्या देवतांच्या नावावर ठेवतात. परंतु सध्या देवतांची थेट नावे ठेवण्याऐवजी त्यांच्याशी संबंधित नावे किंवा त्यांना दिलेली विशेषणे नाव म्हणून वापरली जात आहेत. ‘अकाय’ हे देखील असेच एक नाव आहे. अकाय या नावाचा अर्थ निराकार असा देखील होतो. हे नाव महादेवाला समर्पित असून धार्मिक ग्रंथांमध्ये ‘शिवला अकाय किंवा निराकार’ असे म्हटले आहे.
Virat Kohli : विराट-अनुष्का पुन्हा बनले आई-बाबा, वामिकाला भाऊ की बहिण? नावंही आलं समोर
हे नाव महादेवाला समर्पित आहे, असे का मानले जाते?
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे महादेवाचे(शिवशंकर) भक्त आहेत. ते अनेकदा भगवान शंकराच्या ज्योतिर्लिंगाची पूजा करताना दिसले. याआधीही हे दोघे उज्जैनच्या महाकाल मंदिरात पूजा करताना दिसले होते. आणि अकाय नावाचा संबंध भगवान शिवाशी आहे. तसेच चंद्र महादेवाच्या मस्तकावर आहे आणि चंद्र भगवान शिवाच्या(महादेव) अधीन आहे. त्यामुळे ‘अकाय’ हे नाव भगवान शिवाच्या (महादेव) प्रेरणेने पडलेले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
दरम्यान, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या पहिल्या मुलीचे नाव वामिका आहे. वामिका हे नाव विराट आणि अनुष्का या दोन नावांचे एकत्रिकरण आहे. तसेच या नावाचा खास अर्थदेखील आहे. ‘वामिका’ या नावाचा संस्कृतमध्ये अर्थ होतो ‘देवी दुर्गा’.