फ्रेंच टेनिस स्पर्धेत एशले बार्टी विजेती 

पॅरिस – ऑस्ट्रेलियाच्या एशले बार्टी हिने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील महिलांच्या विभागात विजेतेपदावर मोहोर नोंदविली. सरळ लढतीत तिने चेकोस्लोव्हाकियाच्या मार्केटा वोंन्द्रुसोवा हिचा 6-1, 6-3 असा पराभव केला. एशले बार्टी हिचे या स्पर्धेतील एकेरीचे पहिलेच अजिंक्‍यपद आहे.

स्पॅनिश खेळाडू रॅफेल नदाल याला बाराव्या विजेतेपदासाठी ऑस्ट्रियन खेळाडू डॉमिनिक थिम याच्याशी झुंजावे लागणार आहे. हा सामना आज होणार आहे. उत्कंठापूर्ण झालेल्या उपांत्य फेरीत थिम याने अग्रमानांकित नोवाक जोकोविच याच्यावर सनसनाटी विजय मिळविला. रंगतदार झालेला हा सामना त्याने 6-2, 3-6, 7-5. 5-7. 7-5 असा जिंकला.

या तुलनेत नदाल याने एकतर्फी झालेल्या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर याचा 6-3, 6-4, 6-2 असा दणदणीत पराभव केला. द्वितीय मानांकित नदाल याने यापूर्वी या स्पर्धेत 2005 ते 2008, 2010 ते 2014, 2017 व 2018 मध्ये विजेतेपद मिळविले होते. थिम याने यापूर्वी नदाल याच्यावर मात केली असल्यामुळे अंतिम सामना चुरशीने होण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.