शेगाव – 10 जुलैला आषाढी एकादशी (पंढरपूर यात्रा) आहे. करोनामुळे गेली दोन वर्ष पायी वारी सोहळा झाला नाही, मात्र यंदा पायी पालखी सोहळा होत असल्याने राज्यभरातील वारकरी भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दि. 3 जून रोजी मुक्ताईनगर येथून संत मुक्ताबाई तर कौडण्यपूर येथून रुक्मिणी मात पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. तसेच उद्या (दि. 6जून) शेगाव येथून आषाढी वारीसाठी गजानन महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. पालखीचे हे 53 वे वर्ष आहे.
पालखी सकाळी 7 वाजता मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यानंतर पालखी दुपारी श्री क्षेत्र नागझरी येथे पोहोचेल. तर रात्री पालखीचा मुक्काम पारस येथे असणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 जूनला दुपारी गायगांव येथे पालखी प्रस्थान करणार आहे. तर रात्री भौरद येथे पालखीचा मुक्काम असणार आहे.