Asaduddin Owaisi : आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या हमास आणि इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढली आहे. त्यातच आता जगातील देशांनी समिश्रपणे दोन्ही देशांना पाठिंबा दिला आहे. त्यातच भारतानेही तटस्थ भूमिका घेतली असली तरी इथल्या राजकारण्यांनी आपली बाजू स्पष्टपणे मांडली आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादमध्ये भडकाऊ घोषणा देताना दिसत आहेत. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पॅलेस्टाईनच्या बाजूने घोषणाबाजी करताना दिसत आहे.
एआयएमआयएमने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ एक मोठी बैठक आयोजित केली होती ज्यामध्ये अनेक मुस्लिम धर्मगुरू उपस्थित होते. इस्रायल-हमास युद्धावर असदुद्दीन ओवेसी सतत आपली प्रतिक्रिया देत असून इस्रायली सैन्य गाझावर अत्याचार करत आहे आणि हे थांबले पाहिजे. त्यासोबतच पॅलेस्टिनींना स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र असले पाहिजे. असे म्हटले.
Palestine 🇵🇸 #IndiaWithPalestine #Palestine #India #FreePalestine #PalestineWillBeFree pic.twitter.com/SB9qi45BiO
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) October 23, 2023
पुढे बोलताना त्यांनी,”मी माझ्या देशातील जनतेला सांगू इच्छितो की महात्मा गांधींनी पॅलेस्टाईन ही अरबांची भूमी असल्याचे सांगितले होते, ज्याप्रमाणे इंग्लंड ही इंग्रजांची भूमी आहे आणि फ्रान्स ही फ्रेंचांची भूमी आहे. पॅलेस्टिनींना स्वतःचा स्वतंत्र देश आहे, एक राष्ट्र असायला हवे, असे आम्हाला नेहमीच वाटत होते. इस्रायलने गेल्या 80 वर्षांपासून पॅलेस्टिनी भूमीवर कब्जा केल्याचा आरोप ओवेसी यांनी केला.
त्यासोबतच ते म्हणाले की, भारताने पॅलेस्टाईनच्या जनतेला नेहमीच पाठिंबा दिला आहे. पॅलेस्टिनींना स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र असावे असे भारताला नेहमीच वाटत होते. दरम्यान, युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी ओवेसी यांनी पॅलेस्टाईन आणि गाझा यांची प्रशंसा केली आणि हिंसाचाराचा निषेध केला. एक्सवरील एका पोस्टमध्ये ओवेसी यांनी जेरुसलेमच्या अल-अक्सा मशिदीचा फोटो शेअर केला होता.