सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्यांचा बजाज यांच्यावर हल्लाबोल
नवी दिल्ली : साध्वी प्रज्ञासिंह, झुंडबळी अशा घटनांवरून घेरत या सरकारवर टीका करण्याची उद्योगपतींना भीती वाटते, असे थेटपणे उद्योगपती राहूल बजाज यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, निर्मला सीतारामन आणि पियुष गोयल यांसारख्या ज्येष्ठ मंत्र्यांना ठणकावले. त्यांतर त्यांच्यावर आणि त्यांच्या उद्योगांवर समाज माध्यमांतून हल्ले चढवण्यात आले. मात्र राहूल यांची बाजू घेत कोणीच उतरले नाहीत. मात्र बायोकॉनच्या किरण मुजुमदार शॉ यांनी बजाज यांच्या चिंतेशी सहमती दर्शवली आहे.
विकास आणि वाढीसाठी सरकार भारतीय उद्योग जगताकडे येईल, अशी अपेक्षा आहे. आपल्या अर्थव्यवस्थेबाबत केलेली टीका ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत हे सरकार नाही, असे ट्विट किरण मुजुमदार शॉ यांनी केले. बजाज यांच्यावर सर्वात आधी हल्ला चढवला तो केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी. ते म्हणाले, बजाज यांची वर्तणूक बेशिस्त होती. त्यांनी चुकीचा संदेश प्रसारित केला. ते एका मंत्र्यापुढे उभे राहून बोलू शकतात, ही लोकशाहीच आहे. पुरी यांची री ओढत अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, बजाज यांच्या वक्तव्यामुळे देशहिताचे नुकसान झाले. बजाज यांच्या प्रश्नाला अमित शहा यांनी उत्तर दिले. पण जनता लोक इतरांच्या भावनांऐवजी स्वत:ची मतेच तयार करत असतात.
भाजपाच्या आयटी सेलचे अमित मालवीय यांनी सांगितले की, लायसन्स राजच्या काळात ज्यांची भरभराट झाली, ते नेहमीच कॉंग्रेसच्या बाजून उभे राहतील. या उद्योगपतीचा दिल्लीतील निराश पत्रकार झाला आशी टीकाही त्यांनी केली.
झुंडबळी आणि प्रज्ञासिंह यांचे उदाहरण देत राहूल बजाज यांनी असहिष्णुतेच्या मुद्द्याला हात घातला आहे. त्यावेळी त्यांच्या मुर्ख मेंदूत अर्थव्यवस्था नसते. त्यांच्या डोक्यात वेगळेच “उद्योग’ असावेत, असे भाजपाचे नेते गीव्हीएल नरसिंहा यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात विरोधी मपक्षांचे सरकार सत्तेवर आले आहे. त्या धर्मनिरपेक्ष मित्रांच्या जीवावर त्यांना राज्यसभेची पुन्हा उमेदवारी करायची असावी. त्यामुळे त्यांनी हे विधान केल्याचा आरोपही त्यांनी केला.